अर्थकारण

RBI ने बँक ऑफ इंडिया आणि PNB वर ठोठावला ६ कोटी रुपयांचा दंड

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला दंड ठोठावला आहे. आर्थिक फसवणुकीची प्रकरणांची माहिती देण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँक ऑफ इंडियाला चार कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, बँक ऑफ इंडियाच्या ३१ मार्च २०१९ च्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला असता त्यात काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. तसेच १ जानेवारी २०१९ रोजी फसवणूक देखरेख अहवाल (फ्रॉड मॉनिटरिंग रिपोर्ट) सादर केला. मात्र त्यात फसवणुकीच्या घटनांची उशिरा नोंद घेणे, फसवणूकीचा अहवाल देण्यास विलंब, अशा प्रकारच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडियाला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. ‘पीएनबी’च्या ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१९ अखेरच्या ताळेबंदाची तपासणी केली. त्यात जोखीम व्यवस्थापनातील त्रुटी , फ्रॉडची माहिती देण्यास झालेला उशीर, डेटा अचूकता आणि सुरक्षेची खात्री न करणे यासारख्या कारणांसाठी पीएनबीला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दोन्ही बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago