अर्थकारण

हरित लवादाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड…

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला पर्यावरण विषयक नियमांचं पालन न केल्यानं तब्बल १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ नुसार पर्यावरणाची हानी झाल्यानं आणि घन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापनातील सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे.

राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. घन आणि द्रवरुप कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे न केल्यानं पर्यावरणाची हानी झाल्यानं हा दंड ठोठावला असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र सरकारनं गेल्या आठ वर्षांपासून घन कचरा व्यवस्थापनसाठी आणि द्रवरुपातील कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यकत्या प्रमाणात काम झालं नाही. या क्षेत्रात पर्यावरणासंबंधी आवश्यक तसं काम दिसून आलं नाही. यासंबंधी देण्यात आलेली कालमर्यादा देखील संपून गेल्याचं हरित लवादानं म्हटलं आहे.सातत्यानं होणाऱ्या पर्यावरणाची हानी भविष्यकाळात थांबवता आली पाहिजे. तर, यापूर्वी झालेली पर्यावरणाची हानी भरुन काढता आली पाहिजे, असं हरित लवादानं म्हटलं.

महाराष्ट्र सरकारला द्रवरुप कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळं १०८२० कोटी रुपये तर घन कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यानं १२०० कोटी रुपयांचा असा एकूण १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम महाराष्ट्र सरकारनं येत्या दोन महिन्यात जमा करावी आणि त्याचा वापर मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वापर करण्यात यावा, असं हरित लवादानं म्हटलं आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

पर्यावरण संवर्धनामध्ये कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि पूर्नवापर यंत्रणा, दर्जानिरीक्षण यंत्रणा, ग्रामीण भागातील गाळ व्यवस्थापन अशा बाबीवर ती रक्कम खर्च करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर, राज्यातील ८४ ठिकाणी घन कचरा व्यवस्थापनाबाबत प्रकल्प उभारले जावेत, असं हरित लवादानं म्हटलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago