क्राईम

महिला कॉन्स्टेबलने केली पुरुष कॉन्स्टेबलची हत्या, तब्बल एक महिन्यानंतर समोर आलं सत्य…

मुंबई : एका पुरुष कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी एक महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या दोन साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय शिवाजी माधव सानप हे दररोज पनवेल स्टेशनवरून जात असत. पनवेलहून ट्रेनने ते कुर्ला स्थानकावर जाऊन तिथे उतरून मग नेहरू नगर पोलीस स्टेशनला जायचे, तिथे त्यांची पोस्टिंग होती. 15 ऑगस्ट रोजीही शिवाजी सानप रोजच्याप्रमाणे पनवेल स्टेशनच्या दिशेने जात होते, तेव्हा वाटेत त्यांना एका नॅनो कारने धडक दिली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही केस सुरुवातीला हिट अँड रन केस असल्याचे दिसत होते, पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटले. तसेच पोलिसांना घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर तीच नॅनो कार जळालेल्या अवस्थेत सापडली. कार जळालेली असल्याने कोणताही पुरावा शिल्लक नव्हता.

पोलिसांनी तपास सुरू केला असता शिवाजी सानप आणि महिला कॉन्स्टेबल शीतल पानसरे यांच्यात जुने वैर असल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाईंड शीतल होती, तिने शिवाजी यांना मारण्यासाठी विशाल जाधव आणि बबन चव्हाण यांना सुपारी दिली होती. सुरुवातीला, तिघांनी मिळून शिवाजी सानप यांच्या दिनचर्येवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांना मारण्याचा कट रचला. जाधव आणि चव्हाण यांनीच शिवाजी यांना नॅनो कारने धडक दिली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

महिला कॉन्स्टेबल शीतल पानसरे, विशाल जाधव आणि बबन चव्हाण यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, शीतलने शिवाजीविरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पानसरे यांना वैयक्तिक शत्रुत्वामुळे शिवाजी यांना ठार मारायचे होते, त्यामुळे आरोपी महिला पोलिसाने अपघात घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी गणेशला विकाराबाद तेलंगणा आणि विशालला बुलढाण्यातील पडसी बुद्रुक येथून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago