rapecase
नागपूर : ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नऊ जणांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उमरेड येथे उघडकीस आली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रोशनला ओळखते. हा गुन्हा 19 जून ते 15 जुलै दरम्यान नागपूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात घडला. १९ जूनला दुपारी रोशन व गजानन या मुलीच्या घरी आले. यावेळी रोशन तिला म्हणाला की ‘काम आहे, तू आमच्यासोबत चल.’ त्यानंतर तो या मुलीला घेऊन स्वत:च्या घरी गेला. तिथे या दोघांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला ३०० रुपये देऊन याबाबत कोणाला सांगितल्यास तुला ठार मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर रोशन वारंवार मुलीला घरी बोलवून तिच्यावर अत्याचार करायचा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गजानन पीडित मुलीला भेटला. तिथे तिला धमकी देऊन गजानन व प्रेमदास हे दोघे तिला रोशनच्या घरी घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि अन्य सहा जणांना बोलविले. या सर्वांनी आळीपाळीने मुलीवर अत्याचार केला.
हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांची ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
असे उघडकीस आले प्रकरण
काही दिवसांपूर्वी सोन्याच्या अंगठीसाठी शुभम दमडू (वय २५) याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात उमरेड पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावरून रोशन व त्याच्या एका साथीदाराला अटक केली. त्यांची पोलिस कोठडी घेत पोईसांनी रोशनची कसून चौकशी करण्यात आली. यादरम्यान मुलीवर साथीदारांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याबाबत पीडित मुलीकडे चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. तिने रोशन व त्याच्या साथीदारांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली.
आरोपींची नावे
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…