Breaking: The good news given by Adar Punawala, the announcement of another corona vaccine
नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत ५२ लाख ९० हजार ४७४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरणाची १ लाख ४ हजार ७८१ सत्र पार पडली आणि ३ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. लवकरच कोरोना लसीची भारतीय बाजारात खुली विक्री देखील सुरू होणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस १६ जानेवारी देण्यात आला. २२ नागरिकांचा लस घेतल्यापासून काही दिवसांत वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला. मागील २४ तासांत उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणाऱ्या एका ७७ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर सात दिवसांनी या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेहाचा प्रचंड त्रास होता. लस घेतलेल्यांपैकी एकाही व्यक्तीच्या मृत्यूचे कारण कोरोना प्रतिबंधक लस नाही.
लस घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांचे भारतातील प्रमाण ०.०००५ टक्के एवढे आहे. मागील २४ तासांत लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले नाही. कोरोना प्रतिबंधक लस अतिशय सुरक्षित आहे. या लसचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जातो. लसचे दोन्ही डोस घेतल्याने शरीरात कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करणारी रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते.
पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ने कोविशिल्ड आणि हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ने कोवॅक्सिन विकसित केली आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. दोन्ही लस दोन ते आठ अंश से. तापमानात दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात.
जगभर डॉक्टर, मेडिकल स्टाफ, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. अठरा वर्षे झालेले ते पन्नाशीच्या आतले अशा मोठ्या समुदायाची मागणी सरकारी लसीकरणातून लवकर पूर्ण होणे कठीण आहे. याच कारणामुळे मार्चपासून भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन आणि ऑगस्ट महिन्यापासून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसची भारतीय बाजारात खुली विक्री सुरू होणार आहे. विक्री सुरू झाल्यामुळे ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे.
कुणाला लगेच लस नाही…
गरोदर महिला आणि १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना सध्या लस देणार नाही. लसीकरण मोहिमेच्या माहितीचे विश्लेषण करुन काही महिन्यांनंतर गरोदर महिला आणि १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरणाबाबतचे निर्णय होतील. लसीकरण ऐच्छिक असले तरी पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…