Shocking: Volunteer dies during corona vaccine test
ब्राझील : ब्राझीलमध्ये अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला तरीही लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे.
क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवी चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल कुठलाही शंका नाहीय, असे ऑक्सफर्डचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला लशीचे डोस दिल्यानंतर दुष्परिणाम दिसले होते. त्यानंतर जगभरात ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. लशीच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा चाचण्या सुरु झाल्या. हे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
स्वयंसेवकाला ट्रायल व्हॅक्सीन न देता प्लेसीबो देण्यात आले होते, असे ओ ग्लोबो या ब्राझीलियन वर्तमानपत्राने म्हटले आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या वैद्यकीय माहितीबद्दल गुप्तता बाळगण्याच्या धोरणानुसार, अनविसाने सविस्तर माहिती दिलेली नाही. अस्त्राझेनेकाने यावर अजून तरी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…