कोरोना

ब्रेकिंग : फायझरने भारतात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेला अर्ज घेतला मागे

नवी दिल्ली : फाइझरने भारतातील आपल्या कोव्हीड -१9 लसीचा आपत्कालीन वापरासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे, जी लस जर्मनीतील बायोटेक (Germany’s BioNTech) कंपनीसह विकसित केलेली आहे. फायझरने (Pfizer Inc) अर्ज मागे घेतल्याचे कंपनीने शुक्रवारी स्पष्ट केले.

अमेरिकेतील फार्मा कंपनी भारतात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणारी पहिली औषध निर्माता कंपनी असून, बुधवारी (३ फेब्रुवारी) भारताच्या औषध नियामक प्राधिकरणाच्या विषय तज्ज्ञ समितीशी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

फायझरच्या प्रवक्त्याने सांगितले कि, फायझर प्राधिकरणाशी संपर्कात राहील आणि नियामकांना आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती उपलब्ध करून लवकरच आपत्कालीन वापरासाठी पुन्हा एकदा अर्ज सादर करेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago