ज्येष्ठ रुग्णांना कोरोनामुळे अधिक जोखीम असते, त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी पालिकेने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लक्षणे असलेल्या करोनाबधित ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे.
६० वर्षांवरील रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी धावपळ करणे योग्य नाही. वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णाला पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
६० वर्षांवरील आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सुरुवातीचे चार दिवस सौम्य लक्षणे असली तरी साधारण पाच ते नऊ दिवसांमध्ये अचानक ऑक्सिजनची पातळी कमी होते. अशा वेळेस तातडीने उपचार देणे गरजेचे असते. परंतु रुग्ण घरी असल्यास रुग्णालयात दाखल होईपर्यंत किमान चार तास जातात आणि रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या रुग्णांनी आरोग्य केंद्रामध्ये देखरेखीखाली राहणे अधिक सुरक्षित असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.
उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये ६० वर्षांवरील रुग्ण करोना आरोग्य केंद्रामध्ये दाखल होण्यास तयार नसतात. त्यामुळे देखील असा नियम करण्याची वेळ पालिकेवर आल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत ५७ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील रुग्णांचे झाल्याची नोंद आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…