Gulabrao Patil Tests Corona Positive
जळगाव : ठाकरे सरकारमधील २५ हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे आता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळं लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक आहे. सरकारमधील प्रत्येक मंत्री व अन्य लोकप्रतिनिधी करोनाची काळजी घेताना दिसतात. असं असतानाही लोकप्रतिनिधींना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
गुलाबराव पाटील यांनी काल रात्री ट्वीट करून करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली करोना चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…