Lockdown announced
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असेही त्यांनी सांगितले.
राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी आज सांगितले. कोरोनाची दुसरी लाट सौम्य असेल असा अंदाज होता पण हा अंदाज चूकला. राज्यातील स्थिती आज गंभीर आहे. त्यामुळेच कडक लॉकडाऊनची गरज असून व्यापारी व छोट्या दुकानदारांचाही विरोध आता मावळत चालला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. लोकल, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू याबाबत सर्वंकष विचार करून अंतिम निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…