कोरोना

18 वर्षांवरील व्यक्तीने लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोविड १९ लस दिली जाणार आहे. रजिस्टर कसे करायचे, जाणून घ्या.

कोविड १९ लससाठी असे करा रजिस्ट्रेशन :

  1. सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. याला एन्टर करून व्हेरिफाय बटनवर क्लिक करा.
  2. या वेबसाइटवर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला Registration of Vaccination वर आणले जाईल. या ठिकाणी तुम्हाला फोटो आयडी टाइप, फोटो आयडी प्रूफ नंबर, नाव, जन्म दिनांक, जेंडल आणि अन्य डिटेल्स भरावे लागणार आहे. यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे लागेल. तुम्हाला एसएमएस द्वार सर्व आवश्यक डिटेल्स पाठवले जातील. सर्व डिटेल्स तपासून घ्या. या ठिकाणी तुम्हाला Beneficiary Reference ID दिला जाईल. याला सेव करुन ठेवा.
  3. तुम्ही या अकाउंटला ३ लोकांसोबत लिंक शेयर करू शकता. यासाठी तुम्हाला उकाउंट डिटेल्स पेजच्या खाली दिलेल्या अॅड मोअर बटनवर क्लिक करावे लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही डिटेल्स भरली होती. तितकीच तुम्हाला डिटेल्स एन्टर करावी लागेल.
  4. आपल्या जवळच्या सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जाऊन खाली बाजूस स्क्रॉल करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला मॅप आणि डायलॉग बॉक्स दिसेल. त्यात तुम्हाला एन्टर प्लेस, अॅड्रेस, लोकेशन इत्यादी डिटेल्स एन्टर करावे लागतील त्यानंतर गो बटनवर टॅप करावे लागेल.
  5. अपॉइंटमेंट स्केड्यूल करण्यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल पेजवर जावे लागेल. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर जावे लागेल. त्यानंतर स्केड्यूल अपॉइंटमेंट बटनवर क्लिक करू शकता. असे केल्यानंतर तुम्हाला वॅक्सिनेशन पेजवर बुक अपॉइंटमेंट वर पोहोचवले जाईल. या पेजवर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटरचा पर्याय निवडू शकता.
  6. ज्यावेळी तुम्ही सेंटरचा पर्याय करता. त्यावेळी तुम्हाला स्लॉट दिसेल. यानुसार, स्लॉट निवडा. यानंतर बुक बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज ओपन होईल. सर्व डिटेल्सला चांगल्या प्रकारे चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्या ठरल्या वेळेला लस घ्या.
  7. कोविड १९ लस सर्टिफिकेटला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला cowin.gov.in वर जावे लागेल. याशिवाय, Aarogya Setu अॅपवर सुद्धा जाऊ शकता. आरोग्य सेतू अॅपवर गेल्यानंतर कोविन टॅप वर जावे लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जावे लागेल. यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागेल नंतर Get Certificate बटनवर क्लिक करावे लागेल. या सर्टिफेकट मध्ये नाव, जन्म दिनांक, बेनिफिशियरी रेफरेंन्स आयडी, फोटो ओळखपत्र, लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हे सर्व उपलब्ध असेल.
  8. CoWin वेबसाइट वरून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://selfregistration.cowin.gov.in/vaccination-certificate वर जावे लागेल. त्यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा सर्च बटनवर टॅप करून सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागेल.

लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत?

  1. आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

2 आठवडे ago