रक्‍तदान

रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा आणि गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान द्या – राहुल पारगे

पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान  करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने सहभागी असतात पण हे कारखाने, उद्योग धंदे देखील कोरोनामुळे बंद असल्याने रक्त संकलनास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे.

महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. एम.आय.एम.ई.आर.वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगांव ग्रामीण रुग्णालयाचे गरवारे रक्त केंद्र यांनी आवाहन केले आहे कि जास्तीत जास्त रक्तदान करा. या अवघड पण अशक्य नसलेल्या मोहिमेत विविध सामाजिक संघटना, छोट्या नागरी वस्त्या यांचा सहभाग मिळविण्यासाठी पदाधिकारी यांनी आवाहन करावे व त्या प्रमाणे आमच्या गरवारे रक्त केंद्रास कळवावे. जेणेकरून अशा शिबिरामध्ये आवश्यक तेवढे रक्त संकलन होऊन गरीब, गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान दिले जाईल.

संपर्क :
एम.आय.एम.ई.आर.वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगांव ग्रामीण रुग्णालयाचे गरवारे रक्त केंद्र, तळेगांव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे-४१०५०७. (महाराष्ट्र राज्य) फोन : ०२११४-३०८३९९

डॉ. विजयकुमार पोवार (एम.डी. शरीर विकृती शास्त्र.) – रक्त संक्रमण अधिकारी फोन :  ९६०४८ ७१४७१
राहुल पंढरीनाथ पारगे – जनसंपर्क अधिकारी  फोन : ९९६०० ८९०८९

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago