मानवी शरीरात हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो.
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहार यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते.
हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण ग्रॅम अथवा डेसिलिटरमध्ये तपासले जाते. सहा अथवा तीन महिन्यातून शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चेक करता येते. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण १७ ते २२ असू शकते, लहान मुलांमध्ये हे प्रमाण ११ ते १३ असायला हवे. प्रौढ महिलांमध्ये हिमोग्लोबिन १२ ते १६ तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १४ ते १८ असणे गरजेचे आहे. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे.
शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहार :
आहारात सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर, मटण, मासे, सी-फूड अशा पदार्थांचा समावेश करा. तसेच पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, राजमा आणि डाळी यांचा आहारात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता.
व्यायाम:
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते. खाल्लेले अन्न शरीरात व्यवस्थित शोषले जाते. ज्याचा चांगला परिणाम संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होतो. दररोज १५ मिनिटे प्राणायाम केल्यास शरीराला खूप फायदे मिळतात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…