ब्लॉग

व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? जाणून घ्या आणि तयारी करा ‘त्या’ स्पेशल व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची..

व्हॅलेंटाईन डे : फेब्रुवारी महिना सुरु झाला की चाहूल लागते ती अशा दिवसाची ज्याची प्रेमी युगुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रेमी युगुलं त्यांचं प्रेम १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला साजरं करतात.  प्रेमाच्या त्यांच्या प्रवासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं असतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. किंबहुना हा एक दिवस नव्हे तर संपूर्ण आठवडाच प्रेमी युगुलांसाठी खास असतो. कारण तो व्हॅलेंटाईन वीक असतो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही हा आठवडा 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून सुरु होऊन १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे पर्यंत साजरा होईल.

‘व्हॅलेंटाईन डे’ या दिवशी आठवतं आपलं पहिलं प्रेम. पहिलं प्रेम प्रत्येकाच्या वाट्याला येतंच असं नाही. ती एक वाऱ्याची झुळूक असते जी प्रत्येकाला अनुभव देत नाही. कधी कधी प्रेम जपून ठेवावं असं असतं, तर कधी जखमा देऊन जातं. आपल्या सोबत कोणीतरी हक्काचं माणूस असावं, जे आपल्या सुख-दुःखात कायम सोबत राहील, अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येकजण असतो. काही थोडावेळ सोबत करतात, तर काही आयुष्याचे साथीदार होऊन प्रेम फुलवतात.

व्हॅलेंटाईन डे ची  सुरुवात कशी झाली?  :

आठशे वर्षांपूर्वी रोम राज्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रेम व्यक्त करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग येत असे. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने वेलेंटाईनला तुरुंगात कैद केले.

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचे जेलरच्या आंधळ्या मुलीवर प्रेम बसले. त्याच्या प्रेमाच्या शक्तीने त्या मुलीचे अंधत्व नाहीसे झाले, असे सांगितले जाते. इसवी सन 269 च्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनने प्रेम केले म्हणुन शिक्षा देण्यात आली. व्हॅलेंटाईनला या दिवशी फाशी देण्यात आली. व्हॅलेंटाईनने प्रेयसीला एक पत्र लिहिले होते. या पत्रात ‘यूवर व्हॅलेंटाईन, तुझा चाहता’ असे लिहिले होते. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनच्या स्मरणानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक  : 

  1. 7 फेब्रुवारी, रोझ डे (Rose Day) या दिवशी प्रेमाच्या किंवा आयुष्यातील खास व्यक्तीला गुलाबपुष्प दिलं जातं.
  2. 8 फेब्रुवारी, प्रपोझ डे (Propose Day) :  या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी प्रेम व्यक्त केलं जातं. माझा होशील ना, किंवा माझी होशील ना? असं विचारत साथीदाराकडे प्रेमाची कबुली दिली जाते.
  3. 9 फेब्रुवारी, चॉकलेट डे (Chocolate Day) :  आठवड्यातील तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. नात्यात कायमच गोडवा टिकून राहावा, यासाठीचं प्रतीक म्हणून या दिवशी प्रेमीयुगुलं एकमेकांना चॉकलेट देतात.
  4. 10 फेब्रुवारी, टेडी डे (Teddy Day) :  प्रेमात असणाऱ्या अनेकांसाठी टेडी म्हणजे अगदी खास. पहिलीवहिली भेटवस्तू म्हणून अनेकांचीच या पर्यायाला पसंती असते.
  5. 11 फेब्रुवारी, प्रॉमिस डे (Promise Day) :  जीवनात येणाऱ्या प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ देण्याची वचनं या दिवशी अनेकजण देतात. मुळात या वचनांमागची भावनाच नात्यांना आणखी दृढ बनवते.
  6. 12 फेब्रुवारी, हग डे (Hug Day) :  प्रिय व्यक्तीला मारलेली एक साधी मिठीही खूप काही सांगून जाते. मुळात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्या व्यक्तीचं अस्तित्वंच इथं महत्त्वाचं असतं.
  7. 13 फेब्रुवारी, किस डे (Kiss Day) :  नात्याला एका वेगळ्या वळणावर नेणारा किस डे सुद्धा या व्हॅलेंटाऊन वीकमध्ये साजरा केला जातो.
  8. 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) :  व्हॅलेटाईनच्या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस… 14 फेब्रुवारी! प्रेम करण्याऱ्या व्यक्तीसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा एक स्पेशल दिवस असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा या आठवड्याचा जरी शेवटाचा दिवस असला तरी प्रेमवीरांसाठी त्यानंतरचा प्रत्येक दिवस तितकाच खास असतो. तरूण मुलं -मुली हा दिवस अगदी जल्लोषात साजरा करतात.

चला तर मग, करा तयारी.. व्यक्त होण्याची. आपल्या भावना व्यक्त करा, अशा व्यक्तीकडे ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो. आपण समोरच्या व्यक्तीवर किती प्रेम करतो, ही जाणीव एकमेकांना करून दिली कि नात्यात गोडवा येतो. प्रेम करायलाच हवं. मग ते प्रेयसी, बायको, आईवडील, भाऊ, बहीण, मित्र कोणावरही करता येतं. इतकं साधं अन सरळ असतं प्रेम!

हा लेख तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

3 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

6 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

6 दिवस ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

7 दिवस ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

7 दिवस ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

7 दिवस ago