Government Announcement Hike Msp For Kharif Crops 2021-22
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात खरीप पिकासाठी MSP ची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने सर्वाधिक दरवाढ ही तीळसाठी केली आहे. तीळाचा खरेदी दर हा ४५२ रुपये प्रति क्वींटलने वाढवला आहे. यानंतर तूर आणि उडीद या दोन्ही डाळींच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) क्विंटल मागे ३०० रुपयांनी वाढ केली आहे. सामान्य प्रतिच्या धानाचा भाव हा १८६८ रुपये प्रति क्वींटल होता. तो आता २०२१-२२ साठी वाढवून १९४० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे. बाजरीचा भाव २०२०-२१ मध्ये २१५० रुपये प्रति क्विंटल होता तो आता २२५० रुपये प्रति क्वींटल करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्वीट केलं आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे. खरीप विपणन हंगाम २०२१-२२ साठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींना आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…