तंत्रज्ञान

Google चे नवीन फिचर! आता तुम्ही Google वरून हटवू शकता तुमची वैयक्तिक माहिती…

पुणे : गुगलवर तुमचे वैयक्तिक तपशील दिसल्याने तुम्ही जर अस्वस्थ असाल, तर आता तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही Google कडे तक्रार देखील करू शकता आणि तुमचे वैयक्तिक तपशील हटवू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी एक पॉलिसी आणली आहे. गुगलच्या पॉलिसी हेडने याबाबत माहिती दिली.

गुगलच्या पॉलिसी हेड मिशेल चांग यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले कि, “जेव्हा तुम्ही Google वर तुमचे नाव, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस किंवा घराचा पत्ता शोधता, तेव्हा अनेक वेळा तुम्हाला तिथून ही माहिती सहज मिळते. मात्र, अनेक लोक म्हणतात की खाजगी माहिती सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर असणे योग्य नाही. यामुळे गोपनीयतेसाठी अधिक धोका निर्माण होतो.

युजर्ससाठी नवीन फिचर सादर :

सर्व गोष्टी लक्षात घेऊन, Google ने आता आपल्या वापरकर्त्यांना ही वैयक्तिक माहिती हटविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत तुम्ही Google ला तुमचा फोटो, ई-मेल आयडी किंवा मोबाइल नंबर हटविण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला गुगलच्या हेल्पलाइन ई-मेल आयडीवर ईमेल करावा लागेल.

वापरकर्त्याकडून विनंती मिळाल्यानंतर Google त्या विनंतीचे पुनरावलोकन करणार आहे. त्यानंतर, वापरकर्त्याच्या विनंतीनुसार, त्याचे वैयक्तिक तपशील Google प्लॅटफॉर्मवरून हटवले जाणार आहेत, मात्र असे करूनही, ही माहिती इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकते. ते हटवण्यासाठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मच्या तक्रार आयडीवर तक्रार करावी लागेल. त्यानंतरच तेथून माहिती काढली जाईल.

गुगलने स्पष्ट केले आहे की ते केवळ अशी माहिती हटवत, ज्यामुळे वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा तोटा होण्याची शक्यता असते. उर्वरित माहिती मात्र प्लॅटफॉर्मवर अबाधित राहू दिली जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 तास ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago