तंत्रज्ञान

हार्ले डेविडसन कंपनीचा भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय

अमेरिकेच्या हार्ले डेविडसन या मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता.

हार्ले डेविडसनची बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते आणि भारतात मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे कंपनीने भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हार्ले डेविडसनने एक दशकापूर्वी भारतीय बाजारात प्रवेश केला होता. पण या दहा वर्षांत केवळ 27 हजार बाईकचीच विक्री झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीत 22 टक्क्यांची घसरण झाली होती. अशा परिस्थितीत तोट्यात असलेले बाजार सोडून अमेरिकेतील आपल्या व्यवसायावर कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे.

2019 मध्ये हार्ले डेविडसनने केवळ 2676 बाईकीची विक्री केली होती. यामध्येही 65 टक्के वाटा 750 सीसी बाईकचा आहे, ज्यांची असेम्ब्लिंग हरियाणातच केली जाते. हार्ले डेविडसनच्या एकूण विक्रीचा केवळ पाच टक्के भागच भारतीय बाजारातून येतो. सध्या हार्लेचा हरियाणामध्ये एक असेम्ब्ली प्लांट आहे. तसंच कंपनी पूर्णत: तयार बाईक भारतात आयातही करते. हरियाणामधील असेम्ब्ली प्लांट ऑगस्ट 2009 मध्ये सुरु करण्यात आला होता. इथेच कंपनीने आपली पहिली डीलरशिप नियुक्त केली होती.

हार्लेच्या या निर्णयामुळे भारतातील कंपनीच्या जवळपास 70 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. तर कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक संजील राजशेखरन यांना कंपनीने सिंगापूरला ट्रान्सफर केलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago