तंत्रज्ञान

फ्लिपकार्ट फेस्टिव सीजन सेल : २४ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone

फेस्टिव सीजन सेल मध्ये सर्वच कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सवर ऑफर देत आहेत. आयफोन खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर फेस्टिव सीजन सेल मध्ये iPhone SE 2020 पासून iPhone 11 Pro पर्यंत सर्वात कमी किंमतीत फोन खरेदी करता येवू शकतो.

iPhone SE 2020 यावर्षी लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये हार्डवेयर आयफोन ८ सारखा आहे. परंतु, परफॉर्मन्स अनेक पटीने चांगला आहे. फ्लिपकार्टवर ४२ हजार ५०० रुपयांच्या किंमतीचा हा फोन या सेलमध्ये केवळ २५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि Yono SBI वरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार असून हा फोन केवळ २३ हजार ४०० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

अॅपलचा iPhone XR देखील फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेजमध्ये डिस्काउंट मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन मोठ्या LCD डिस्प्ले आणि A12 Bionic चिपसेट सोबत येतो. या फोनवर १४ हजार ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. ५२ हजार ५०० रुपयांचा ओरिजनल किंमत असलेला हा आयफोन ग्राहकांना ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तसेच SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि Yono SBI वरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार असून हा फोन केवळ ३४ हजार २०० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

iPhone 11 Pro या ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत येणाऱ्या पॉवरफुल फोनची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये आहे. बिग बिलियन डेज सेलमध्ये हा फोन ७९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तसेच SBI डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि Yono SBI वरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार असून हा फोन केवळ ७२ हजारांत खरेदी करता येणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 महिने ago