तंत्रज्ञान

जुन्या पेट्रोल स्कूटरचे रूपांतर करा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, किती खर्च येईल? जाणून घ्या…

बंगळुरू : देशात इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत. त्याचबरोबर ई-वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून डीलर आणि ग्राहक दोघांनाही सबसिडी दिली जात आहे. दरम्यान, बेंगळुरूस्थित काही स्टार्टअपने पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नवीन ई-स्कूटर खरेदी करण्याची गरज नाही.

बंगळुरूमध्ये राईड-शेअरिंग स्टार्टअप कंपनी बाउन्सने अशीच योजना सुरू केली आहे. कंपनी कोणत्याही पेट्रोल इंजिन स्कूटरला इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी बसवून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त 20 हजार रुपये घेते. बाउन्सने आतापर्यंत एक हजाराहून अधिक जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर केले आहे. कंपनी जुन्या स्कूटरमध्ये एक रेट्रोफिट किट ठेवते ज्यात इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी समाविष्ट असते. स्कूटरमध्ये बसवलेली बॅटरी किट एका चार्जवर 65 किमी पर्यंत चालते. हे किट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे प्रमाणित आहे.

बाऊन्सचे सह-संस्थापक विवेकानंद हल्लेकरे म्हणाले की, कंपनीने पायलट प्रोजेक्ट स्वरूपात जुन्या पारंपरिक स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली आहे. नंतर त्यांना समजले की पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक मोठी बाजारपेठ असू शकते. त्यांची कंपनी या स्कूटर मालकांसाठी सेवा केंद्रे देखील उघडत आहे. बाउन्स नंतर, आता इतर कंपन्यांनी देखील हे काम सुरू केले आहे, ज्यात एट्रियो (Etrio) आणि मेलाडाथ (Meladath) ऑटो कॉम्पोनेंट्सचा समावेश आहे.

मेलाडाथ अशी सोपी हायब्रिड किट बाजारात आणण्याची तयारी करत आहे, जी कोणत्याही जुन्या पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिक हायब्रिड स्कूटरमध्ये सहज रूपांतरित करू शकते. म्हणजेच, जर गरज असेल तर ही स्कूटर पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कोणत्याही मोडमध्ये चालवली जाऊ शकते. मेलाडाथ यासाठी 40 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारेल.

अल्टीयस ऑटो सोल्युशन्स कंपनीचे संस्थापक राजीव अरोरा यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीची किंमत 13 ते 15 हजार प्रति किलोवॅट आहे. त्याचबरोबर सरकार प्रति किलोवॅट 15,000 रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. यामुळे उत्पादकांना प्रति किलोवॅट 2,000 रुपयांची बचत होते. अशा प्रकारे, वाहनात वापरल्या जाणाऱ्या इतर भागांची किंमत कमी होते.

राजीव यांनी सांगितले की ई-स्कूटर तयार करण्यासाठी सुमारे 30 ते 45 हजार रुपये खर्च येतो. हा फरक आहे कारण इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्सचा वापर केला जातो. स्कूटर बनवण्याचा सर्वात मोठा खर्च म्हणजे त्याची मोटर. सध्या दोन प्रकारच्या मोटर्स वापरल्या जात आहेत. मोटरच्या गुणवत्तेनुसार स्कूटरची किंमत बदलते.

हब मोटर : हे वाहनाच्या चाकाच्या आत वापरले जाते. त्याची किंमत 20 हजारांच्या जवळपास आहे.
मिड ड्राईव्ह मोटर : हे वाहनाच्या मध्यभागी स्थापित केले जाते. चेन किंवा बेल्टच्या मदतीने वाहन चालवते. ही मोटर थोडी महाग असते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago