नवी दिल्ली : लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. यासाठी ते नवीन पद्धतींचा अवलंब करत असतात. लोकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आता एक नवीन मालवेअर सापडला आहे. या मालवेअरने अँड्रॉइड वापरकर्त्यांचे आतापर्यंत लाखो डॉलर्स चोरले आहेत.
झिम्पीरियमच्या (Zimperium) सुरक्षा तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. हे मालवेअर अॅप्स आपल्या फोनवर स्थापित केले जाऊ शकतात आणि आपले पैसे चोरू शकतात. त्यामुळे सूची तपासून तुम्ही तुमच्या फोनवरून हे धोकादायक ऍप्स त्वरित हटवणे आवश्यक आहे. गुगलने 136 अॅप्सवर बंदी घातली आहे. यापैकी काही ऍप्स Handy Translator Pro, Heart Rate and Pulse Tracker, Geospot: GPS Location Tracker, iCare – Find Location आणि My Chat Translator अजूनही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये आहेत.
झिम्पीरियम zLabs च्या सुरक्षा तज्ञांनी असे म्हटले आहे की त्यांना या ऍप्समध्ये Grifthorse Android Trojan सापडले आहे. हे मालवेअर जगभरातील 10 दशलक्षाहून अधिक Google Android वापरकर्त्यांना लक्ष्य करत होते. हे मालवेअर प्रभावित ऍप्स चुकीची माहिती आणि परवानगीच्या विनंत्यांसह Google Play Store वर उपलब्ध होते.
हे ऍप्स गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत. परंतु, याचा अर्थ असा नाही की GriftHorse हार्डवेअर असलेले ऍप्स वापरकर्त्यांच्या फोनमध्ये नाहीत. आपल्याला आपल्या फोनवरून हे ऍप्स हटवावे लागतील.
या अॅप्सची संपूर्ण यादी :
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…