क्रीडा

पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी खेळेल का? CSK संघाचे CEO विश्वनाथन यांनी दिली माहिती

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL मध्ये पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण या सीझनमध्ये त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. पण, कर्णधाराने कधीही पळ काढायचा नसतो असं सांगत धोनीने त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. अशातच आता CSK चे CEO कासी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल महत्त्वाची अपडेट दिली.

“IPLमध्ये धोनीने संघासाठी ३ विजेतेपदं मिळवून दिली आहेत. बाद फेरीसाठी पात्र न ठरण्याची ही आमच्या संघाची पहिलीच वेळ आहे. आमच्या संघाएवढं सातत्य आजपर्यंत इतर कोणत्याही संघाने दाखवलेलं नाही. एका खराब वर्षामुळे आम्ही सरसकट बदल करायला हवा असं अजिबात नाही. पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी नक्की खेळेल आणि मला खात्री आहे की तो संघाचं नेतृत्व करत असेल. IPL २०२१ मध्ये CSKचा कर्णधार धोनीच असेल”, असे विश्वनाथन एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

“यंदाच्या हंगामात आम्हाला आमच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. काही सामने आम्ही जिंकायला हवे होते, पण ते सामने आम्ही गमावले. अशा अटीतटीच्या सामन्यांचा आम्हाला फटका बसला. सुरेश रैना, हरभजन सिंग या दोघांनी घेतलेली माघार आणि स्पर्धेच्या आधी कोरोनाचा CSKच्या गोटात झालेला शिरकाव यामुळे संघाचं संतुलन काहीसं बिघडलं”, असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago