tokyo olympics wrestler ravi kumar dahiya bitten by nurislam sanayev
टोकियो ऑलिम्पिक : कुस्तीपटू रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे पदक निश्चित केले आहे. त्याने बुधवारी 57 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव केला, पण सामना संपल्यानंतर या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.
कझाक कुस्तीपटू नुरिस्लाम याने सामन्यादरम्यान कुस्तीपटू रवीच्या हातामध्ये दात घुसवले आणि तो रवीला चावताना दिसत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नुरिस्लामने रवीवर 10-2 अशी आघाडी घेतली. त्याला वाटू लागले होते की तो रवीला सहज पराभूत करेल. परंतु, काही काळानंतर रवीने दमदार पुनरागमन केले आणि नूरीस्लामला पराभूत केले. सामन्याच्या शेवटच्या ६० सेकंदात, रवीच्या डावामुळे घाबरलेल्या नुरिस्लामने रवीच्या हातामध्ये दात घुसवून त्याला जोरदार चावा घ्यायला सुरुवात केली, पण रवीने हा त्रास सहन केला आणि आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि नुरिस्लामला हरवत हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर रवीने रेफरीला हात दाखवत याबाबत सांगितले.
रवीचा अंतिम सामना गुरुवारी होईल, जिथे रवी सिल्वर किंवा गोल्ड मेडलसाठी सामना खेळणार आहे. रवी उपांत्य फेरीत 8 गुणांनी पिछाडीवर होता. तो हरेल असे वाटत असतानाच 1 मिनिट शिल्लक असताना रवीने कझाक कुस्तीपटूला सामन्यातून बॅड केले. त्याला विक्ट्री बाय फॉल रूलनुसार विजेता घोषित करण्यात आले.
विक्ट्री बाय फॉल रूलनुसार विजय म्हणजे काय?
रवीने कझाक पैलवानाला चित करत सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये याला व्हिक्टरी बाय फॉल असे म्हणतात. जेव्हा एखादा पैलवान प्रतिस्पर्ध्याला चित करत त्याचे दोन्ही खांदे मॅटवर टेकवतो, तेव्हा त्याला विक्ट्री बाय फॉल रूलनुसार विजय म्हणतात. ऑलिम्पिक स्तरावर विशेषतः उपांत्य फेरीत असे विजय दुर्मिळ असतात. रवीने नूरीस्लामला चित केले तेव्हा रवी 7-9 ने मागे होता. अधिकृत स्कोअर 7-9 राहिला, परंतु प्रतिस्पर्ध्याला चित केल्याने रवीला तात्काळ विजय मिळाला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…