क्रीडा

IPL 2020 : SRH vs DC सनरायजर्स हैदराबादचा ८८ धावांनी विजय

दुबई : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सनरायजर्स हैदराबादने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. तर दिल्लीच्या संघाची पराभवाची हॅटट्रिक झाली.

IPL 2020: हैदराबादची तुफान फटकेबाजीच्या जोरावर दोनशेपार मजल

टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा घेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये २ बाद २१९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी सनरायजर्स हैदराबादला शतकी सलामी दिली. वॉर्नर ६६ धावा करुन रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन बाद झाला. नंतर आलेल्या मनिष पांड्येने वृद्धिमान साहाला चांगली साथ दिली. वृद्धिमान साहाने ८७ धावा केल्या. यानंतर मनिष पांड्ये आणि केन विल्यमसन अखेरपर्यंत नाबाद राहिले. मनिष पांड्येने ४४ धावांची खेळी केली तर केन विल्यमसनने ११ धावा केल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

2 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

2 आठवडे ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

2 आठवडे ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago