क्रीडा

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विराटसेनेचा १० विकेट्स राखून दणदणीत विजय, विराटने आयपीएलमध्ये रचला इतिहास तर पडीक्कलचे पहिले शतक…

मुंबई : राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेले टार्गेट बंगळुरुच्या सलामी जोडीने सहज पार केले. या सामन्यातील दिमाखदार विजयासह बंगळुरुने सलग चौथा विजय नोंदवत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने निर्धारित 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने बंगळुरुच्या डावाला सुरुवात केली. या दोघांना बाद करण्यात राजस्थानच्या एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. देवदत्त पडिक्कलने 52 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीने 47 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 72 धावांची खेळी केली.

आयपीएल सामन्यात राजस्थाननं बंगळुरुसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. राजस्थानने सुरुवातीला चार विकेट झटपट गमावल्या. सुरुवातीला जोस बटलर, मनन वोहरा, डेविड मिलर आणि संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्यानं राजस्थानचा डाव गडगडला. मात्र शिवम दुबे आणि रियाननं राजस्थानचा डाव सावरला. त्यानंतर रियान पराग 25 धावा करुन बाद झाला. तर शिवम दुबे केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बाद झाला. शिवमने 32 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवतियाने 23 चेंडूत 40 धावांची खेळी केली. मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत 4 षटकात 27 धावा देत 3 तर हर्षल पटेलने 4 षटकात 47 धावा देत 3 गडी बाद केले.

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात विराट आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. बंगळुरुने १७ व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केलं. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरुने हा विजय मिळवला. देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे. या विजयासह बंगळुरुचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत.

  1. देवदत्त पडीक्कलचे अफलातून शतक
    बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने चौकार ठोकत 51 चेंडूत शतक झळकावलं आहे. देवदत्तच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं आहे. देवदत्त आयपीएलमध्ये शतक लगावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे.
  2. विराटने आयपीएलमध्ये रचला इतिहास, ६००० धावा करणारा पहिला फलंदाज
    विराटने ४७ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.विराट कोहलीनं आयपीएलमधलं ४० वं अर्धशतक केलं. या अर्धशतकासंह त्याने आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहे. आयपीएलमध्ये इतकी धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज आहे.
  3. गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ
    या सामन्यातील दिमाखदार विजयासह बंगळुरुन सलग चौथा विजय नोंदवला असून या विजयासह आरसीबीने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago