क्रीडा

IPL 2020 RR vs MI : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली, जाणून घ्या दोन्ही संघांत नेमके कोणते बदल झाले

आबुधाबी: आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. रोहित शर्मविना खेळतानाही मुंबईने चेन्नईसारख्या संघावर दणदणीत विजय मिळवला होता. काही सामन्यांचा अपवाद वगळता संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे आतापर्यंत या संघात फारसे बदल झालेले दिसले नाहीत.

चेन्नईविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे कायरन पोलार्डने संघाचं नेतृत्व केलं. प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ अवघी काही पावलं दूर आहे. त्यामुळे राजस्थाविरुद्ध सामन्यात विजय मिळवत आपलं अव्वल स्थान कायम राखण्याकडे मुंबईचा कल असणार आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यातही कायरन पोलार्डच मुंबईचं नेतृत्व करणार आहे.

राजस्थान रॉयल्सपेक्षा मुंबई इंडियन्सचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. या संघाचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं असून यापुढील सामन्यांमध्ये एखादी चमत्कारीक खेळी राजस्थानला वाचवू शकते. अबुधाबीच्या मैदानावर मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्जने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात मुंबईने संघात एक बदल केला असून कुल्टर-नाईलच्या जागेवर जेम्स पॅटिन्सन संघात परत आला आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago