क्रीडा

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचे अचूक ‘लक्ष्‍यभेद’ पॅरिस ऑलिम्‍पिकमध्ये देशाला दुसरे कांस्यपदक

मुंबई : नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या दोघांनी अचूक लक्ष्‍यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. विशेष म्‍हणजे मनू भाकरचे हे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. देशवासीयांना त्यांचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी काढले.

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात देशाला दुसरे ऑलिम्पिक कांस्‍य पदक जिंकून दिले, त्याबद्दल मंत्री बनसोडे यांनी अभिनंदन केले. तसेच भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिंकमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा विश्वास मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago