क्रीडा

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले, भालाफेकमध्ये रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिक : भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आज, ऑलिम्पिकच्या 16 व्या दिवशी भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा पूर्ण झाल्या. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले.

नीरज चोप्राने इतिहास रचला
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर नीरज दुसरा भारतीय ठरला.

शेवटच्या फेरीत नारजने 84.24 मीटर भाला फेकला. चौथ्या फेरीत आणि पाचव्या फेरीत नीरजचा थ्रो व्यर्थ गेला आणि त्याला अवैध घोषित करण्यात आले. यानंतरही, दुसऱ्या फेरीत त्याने फेकलेल्या 87.58 मीटरने त्याला अव्वल ठेवले. नीरजने तिसऱ्या फेरीत 76.79 मीटर भाला फेकला आणि या थ्रोमुळे त्याची थोडी निराशा झाली.

दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने पहिल्या प्रयत्नापेक्षाही अधिक चांगला स्कोर केला आणि यावेळी त्याचा भाला 87.58 मीटरपर्यंत गेला. हातातून भाला सोडल्यानंतरच नीरजला कळले की त्याचा थ्रो खूप चांगला आहे आणि त्याने आपले दोन्ही हात हवेत उंच करत ते दर्शवले.

पहिल्या थ्रोमध्ये भारतीय स्टार नीरजने शानदार स्कोअर केला आणि 87.03 मीटरपर्यंत भाला फेकला. त्याने पहिल्या प्रयत्नात अव्वल स्थान पटकावले तर जर्मन खेळाडू नी वेबेल ज्युलियन 85.30 सह दुसऱ्या स्थानावर राहिला. चेक रिपब्लिकच्या जेकबने 83.83 मीटरच्या थ्रोसह तिसरे स्थान पटकावले. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपददक जिंकवून दिले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago