क्रीडा

इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनचे सर्वत्र होतेय कौतुक, गुडघ्याला दुखापत होऊनही…

ओव्हल कसोटीत इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या पॅंटवर गुडघ्याजवळ रक्ताचे डाग दिसत आहेत. चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आश्चर्य व्यक्त केले की रक्तस्त्राव झाल्यानंतरही अँडरसन गोलंदाजी करत राहिला.

यावेळी कोहली आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर होते. अँडरसनने कोहलीवर दबाव आणला आणि चेतेश्वर पुजाराची विकेटही घेतली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या मेहनतीमुळे भारतीय संघ चौथ्या कसोटीत बॅकफूटवर आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 191 धावांवर गुंडाळले.

सामन्यादरम्यान, जेव्हा अँडरसन गोलंदाजी करत होता, तेव्हा कॅमेरामनने कॅमेरा त्याच्या गुडघ्याकडे घेतला आणि त्याच्या पँटवर रक्त दिसले. ही घटना भारतीय डावाच्या 42 व्या षटकात घडली, जेव्हा कर्णधार विराट कोहली (50) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (5) फलंदाजी करत होते. रक्तस्त्राव होऊनही अँडरसनने गोलंदाजी सुरूच ठेवली. मात्र, त्याला कधी आणि कशी दुखापत झाली हे कळू शकले नाही. 39 वर्षीय अँडरसनने आतापर्यंत मालिकेत 20.79 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago