Ipl 2022 Rcb Harshal Patel Sister Passed Away he Left Ipl Bio Bubble
IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची बहीण अर्चिता पटेल यांचे निधन झाले आहे. यानंतर हर्षल बायो बबल सोडून घराकडे निघाला आहे. काल हर्षल मुंबईविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचे निधन झाले. अर्चिता तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असून काही दिवसांपासून आजारी होती. हर्षल एक दिवसासाठी त्याच्या घरी गेला असून एक दिवसानंतर तो संघात सामील होईल. मात्र, बायो बबलच्या बाहेर गेल्यामुळे त्याला क्वारंटाइनचा नियम पाळावा लागू शकतो आणि तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर राहू शकतो. आरसीबीचा पुढील सामना १२ एप्रिलला चेन्नईशी होणार आहे.
हर्षलने या हंगामात आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने चार सामन्यांत सहा विकेट घेतल्या असून त्याची इकॉनॉमी सहापेक्षा कमी आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही त्याने आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. या सामन्यात त्याने चार षटकात २३ धावा देत दोन विकेट घेतल्या.
आरसीबी व्यवस्थापनाने मदत केली
हर्षल पटेलच्या बहिणीच्या मृत्यूनंतर आरसीबी व्यवस्थापनाने घाईघाईत त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली. व्यवस्थापनाच्या मदतीने हर्षल त्याच्या घरी पोहोचला आहे. बहिणीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर तो पुन्हा आयपीएलमध्ये आपल्या संघात सामील होणार आहे.
गतवर्षी पर्पल कॅप जिंकणारा हर्षल यंदा त्याच्या संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. मेगा लिलावात त्याला RCB संघाने 10.75 कोटींना विकत घेतले. आतापर्यंत त्यांची कामगिरी त्याच्या किंमतीशी सुसंगत आहे.
हर्षल हा साणंदचा रहिवासी आहे
हर्षल पटेल हा गुजरातमधील साणंदचा रहिवासी आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हरियाणाकडून खेळतो. आयपीएल 2021 मध्ये अप्रतिम कामगिरी करून हर्षलने भारतीय संघातही स्थान मिळवले आहे. त्याने भारतासाठी आठ टी-२० सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 विश्वचषकातही हर्षलचे खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. बुमराह आणि भुवनेश्वरनंतर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून तो भारतीय संघाचा भाग बनू शकतो.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…