क्रीडा

IPL RR v RCB 2022 : राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर फायनलमध्ये, जोस बटलरचे धमाकेदार शतक, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम

अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तसेच एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. तर जोस बटलरच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव करून आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे.

IPL 2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये जॉस बटलरच्या शतकच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 7 विकेटने पराभव करत आयपीएलची फायनल गाठली आहे. जॉस बटलरचं या आयपीएलमधलं हे चौथं शतक आहे. आरसीबीने दिलेलं 159 रनचं आव्हान राजस्थानने 18.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं. बटलरने 60 बॉलमध्ये नाबाद 106 रन केले, यामध्ये 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला 2 आणि वानिंदु हसरंगाला 1 विकेट मिळाली.

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आरसीबीला 20 ओव्हरमध्ये ८ गाडी बाद करत 157 धावांवर रोखलं. आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक 58 धाव केल्या. फाफ डुप्लेसिस (25) आणि ग्लेन मॅक्सवेल (24) यांना चांगली सुरूवात मिळूनही मोठा स्कोअर करता आला नाही. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णाने 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर मकॉयने 4 ओव्हरमध्ये 23 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. याशिवाय बोल्ट आणि अश्विन यांना 1-1 विकेट घेण्यात यश मिळालं.

फायनल मॅच गुजरात-राजस्थानमध्ये
रविवार 29 मे रोजी आयपीएल 2022 ची फायनल गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वात 2008 साली झालेली पहिली फायनल जिंकली होती, तर गुजरात टायटन्सचा आयपीएलचा हा पहिलाच मोसम असून त्यांनी पहिलीच मोसमात अंतिम फेरी गाठली आहे.

बटलरची विक्रम : 
बटलरने या सामन्यात ६० चेंडूंत १०६ धावांची खेळी साकारली. राजस्थानकडून या हंगामात खेळताना ८१७ धावा केल्या आहेत आणि या हंगामातील सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याच्या नावावरच यावेळी ऑरेंज कॅप असेल, यात शंका नाही. बटलरने या सामन्यात षटकारासह आपल्या ८०० धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये आठपेक्षा जास्त धावा करणार तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी एका हंगामात ८०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या यादीमध्ये आता बटलरचा समावेश झाला आहे. राजस्थानकडून एकाही फलंदाजाला आतापर्यंत अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने आत्तापर्यंत ८० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६२ चौकार तर १२९ षटकार लगावाले आहेत. विशेष बाब म्हणजे या हंगामाला सुरूवात झाली तेव्हापासून आँरेंज कॅप त्याच्याजवळचं आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या यादीत त्याने विराट कोहलीशी बरोबरी केली आहे. २०१६ साली कोहलीने चार शतके झळकावली होती. बटलरने यावर्षी आतापर्यंत चार शतकं पूर्ण केली असून त्याने कोहलीशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत जर बटलरने शतक साकारले तर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा मान त्याला मिळू शकतो. राजस्थानकडून सर्वाधिक पाच शतकं आता बटलरच्या नावावर आहेत, यापूर्वी अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी दोन शतकं झळकावली होती. बटलरने या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि केकेआरबरोबर शतके झळकावली आहेत. त्यामुळे आता आयपीएलच्या अंतिम सामन्यात जेतेपद कोण पटकावतं याबरोबरच बटलर शतक करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे ऑरेंज कॅपबरोबर बटलर अजून कोणते पुरस्कार पटकावतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

1 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago