आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएल स्पर्धा होणार आहे.
कोरोनामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळ ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूदाबी आणि १२ सामने शारजाह मध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक नंतर जाहीर कऱण्यात येणार आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…