क्रीडा

India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेला पहिल्या एकदिवस सामना सिडनी ग्राऊंडवर खेळवला जात आहे. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार अ‌ॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या.

सलामीवीर फिंच आणि वॉर्नरने 27 ओव्हरपर्यंत एकही विकेट पडू दिली नाही. दोघांनीही आपापली अर्धशतके झळकावली. 28 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड वॉर्नर 76 चेंडूंमध्ये 69 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथने फिंचला चांगली साथ दिली. अ‌ॅरॉन फिंचने आपलं शतक पूर्ण केलं. आपल्या कारकीर्दीतलं 17 वं शतक त्याने झळकावलं. फिंचने 124 बॉलमध्ये 114 रन्स केल्या. स्मिथने दमदार खेळी करताना 66 बॉलमध्ये 105 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. मॅक्सवेलनेही 19 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

सुरुवातीला संथ खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 25 ओव्हर पार केल्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने आक्रमक फटके खेळून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने 76 बॉलमध्ये 69, अ‌ॅरॉन फिंचने 124 बॉलमध्ये 114, स्टिव्हन स्मिथने 66 बॉलमध्ये 105, मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 धावा केल्या.

भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि सुजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलने 10 ओव्हरमध्ये सर्वाधिक 89 धावा दिल्या. मोहम्मद शमीने सर्वात कमी 53 धावा दिल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago