क्रीडा

भारताने तब्बल १६ गोल करत पाकिस्तानला दिला सर्वात मोठा धक्का..

जकार्ता : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले चार संघ हे विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. भारताने पाकिस्तानला मागे सारून अव्वल चारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले.

पाकिस्तानला मागे टाकून अव्वल चार संघांत प्रवेश करण्यासाठी भारताला इंडोनेशियाविरुद्ध १५-० अशा विजयाची गरज होती. भारताने गुरुवारी इंडोनेशियावर १६-० विजय मिळवला. त्यात पाकिस्तानला जपानकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘अ’ गटात दुसरे स्थान मिळवून भारताने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला, तर पाकिस्तानला गटातूनच बाहेर पडावे लागले. त्याचबरोबर अव्वल चारमध्ये राहून भारताने वर्ल्ड कपमधील प्रवेशही निश्चित केला. पाकिस्तानचे जपानविरुद्धच्या सामन्यातील दोन गोल व्हिडिओ रेफरलने नाकारले. त्यामुळे त्यांना २-३ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताने १५-० विजय मिळवला असता तर भारत आणि पाकिस्तानचा गोलफरक समान १२-० झाला असता, मात्र भारताने जास्त गोल केल्यामुळे (१८-१६) आगेकूच केली असती, मात्र भारताने १६-० असा विजय मिळवला. त्यामुळे भारताचा गोलफरक १३ झाला, तर पाकिस्तानचा १२ भारताने पाकला मागे टाकत आगेकूच केली. खर तर भारतास लक्ष्य साधता येणार का याची चिंता होती. पाकिस्तान तसेच जपानविरुद्ध गोलच्या संधी दवडल्या होत्या. त्यातच इंडोनेशियाविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात प्रत्येकी तीन गोल केल्यामुळे अखेरच्या दोन सत्रात किमान नऊ गोलचे आव्हान होते. सुरुवातीच्या सत्रात पेनल्टी कॉर्नर दवडले जात असल्यामुळे संघावरील दडपण वाढत होते. तिसऱ्या सत्रात चारच गोल झाले, पण अखेरच्या सत्रात सहा गोल करीत भारतीयांनी मोहिम फत्ते केली.

तुलनात्मक कामगिरी भारत वि. पाक
भारताचे निकाल
वि. पाकिस्तान १-१
वि. जपान २-५
वि. इंडोनेशिया १६-०

पाकिस्तानचे निकाल
वि. भारत १-१
वि. इंडोनेशिया १३-०
वि. जपान २-३

भारताचे गोल करणारे खेळाडू
– दिपसन तिर्कीचे चार गोल (४२, ४७, ५९, ५९ व्या मिनिटास)
– सुदेव बेलिमग्गा याचे तीन गोल (४५, ४६, ५५ व्या मिनिटास)
– पवन राजभार (७०, ११), एस व्ही. सुनील (१९, २४), कार्ती सेल्वम (४०, ५६) यांचे प्रत्येकी दोन गोल
– उत्तम सिंग (१४, निलम संजीप सेस (२०), बिरेंदर लाक्रा (४१) यांचा प्रत्येकी एक गोल

अशी झाली लढत, तपशील भारत इंडोनेशिया
गोल १६ -०
शॉटस ३६ -१
गोलक्षेत्रात ४३- १
वर्चस्व ८०% २०%
पेनल्टी कॉर्नर २४ ०
कॉर्नरवर गोल ८ ०

भारताचे हॉकीतील सर्वात मोठे विजय
– २६-० वि. हाँगकाँग (२०१८, आशियाई क्रीडा स्पर्धा, तेरा जणांचे गोल
– २४-० वि. अमेरिका (१९३२, ऑलिम्पिक – मेजर रुपचंद यांचे १० गोल तर मेजर ध्यानचंद यांचे ८ गोल)
– २२-० वि. हाँगकाँग (१९५४, दोन देशातील मालिकेत)

भारताच्या सुपर फोरमधील लढती ः लि. जपान (२८ मे), वि. मलेशिया (२९ मे) आणि वि. दक्षिण कोरिया (३१ मे).

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago