Ind vs Aus When Bowl When time is right But we need To Groom other All Rounders Says hardik Pandya
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सिडनीच्या मैदानावर भारताचा 66 धावांनी पराभव झाला. त्या वेळेस हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. तो म्हटला कि संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, असे हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे.
हार्दिक पांड्या मागील वर्षापासून पाठीच्या आजारामुळे हार्दिक बोलिंग करु शकत नाही. संपूर्ण आयपीएलच्या हंगामात त्याने मुंबईकडून केवळ बॅटिंग केली. सध्या तो त्याच्या बोलिंग अॅक्शनवर तसंच बोलिंग स्पीडवर काम करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव भासल्याचं स्वत: कर्णधार कोहलीने मान्य केलं. अशातच बोलिंगचा सहाव्या पर्यायासाठी भारतीय संघाने दुसऱ्या ऑलराऊंडरचा शोध घेणे आवश्यक आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
भारतीय संघाला असा खेळाडू हवा जो भारतीय संघाकडून खेळलेला आहे. पाच बोलर्सला घेऊन खेळणे मुश्किल असू शकतं कारण जर कोणत्याही एका बोलर्सचा दिवस खराब असेल तर त्याच्या ओव्हर्स भरून काढणारं दुसरं कुणीही नसतं. अशा परिस्थितीत संघाला असा पर्याय कोण देऊ शकतं, असा प्रश्न हार्दिकला विचारल्यावर त्याने त्याचा भाऊ क्रुणालचं नाव घेतलं. हार्दिक म्हणाला, “निवड समितीने क्रुणालच्या नावाचा समावेश करायला हरकत नाही. भारतीय संघाकडे दुसरे पर्याय असतील तर त्यांचाही त्यांनी विचार करायला हवा. पण नसतील तर क्रुणालचा पर्याय आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…