मँचेस्टर कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी १३७ धावांत वेस्ट इंडिजचे ६ गडी माघारी पाठवले. पण अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर थांबवावा लागला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने सहापैकी २ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने एक विक्रम केला. तसेच त्याने कपिल देव, ग्लेन मॅकग्रा या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले.
दुसऱ्या दिवसाच्या खेळात २ बळी घेत अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वाधिक गडी बाद करणारा इंग्लिश खेळाडू ठरला. अँडरसनने वेस्ट इंडिजविरूद्ध ८७ बळी टिपले. जागतिक क्रिकेटमध्येदेखील तो सर्वाधिक वेस्ट इंडिज फलंदाजांना माघारी धाडणारा तिसरा फलंदाज ठरला. ग्लेन मॅकग्रा (११०) आणि कपिल देव (८९) या दोन दिग्गज गोलंदाजांनंतर त्याने सर्वाधिक वेस्ट इंडिज फलंदाज बाद केले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…