Cricketer Praveen Kumar's car accident
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारचा अपघात झाला आहे. क्रिकेटपटूच्या कारला कंटेनरने जोरात धडक दिली आहे. यावेळेस क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांचा मुलगाही त्याच्यासोबत होता. सुदैवाने, क्रिकेटर आणि त्याच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नसून दोघेही सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरने धडक दिली. यावेळी क्रिकेटर आणि त्याचा मुलगा कारमध्ये होते. प्रवीण कुमार हे बागपत रोडवरील मुलतान नगरमध्ये राहतात. प्रवीण कुमार रात्री १०.३० च्या सुमारास कारमधून पांडवनगरकडे जात होते, प्रवीण कुमार आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये क्रिकेटपटूच्या गाडीचे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लोकांनी कंटेनर चालकाला पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कंटेनर चालकाला पोलिस ठाण्यात नेले.
३६ वर्षीय प्रवीण कुमार भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. प्रवीण कुमार सध्या क्रिकेटपासून दूर आहेत, पण ते अनेक वर्षे टीम इंडियाकडून खेळले आहेत. त्यांनी ६ कसोटीत २७ विकेट, ६८ एकदिवसीय सामन्यात ७७ विकेट आणि १० टी-२० सामन्यात ८ विकेट घेतले. २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या प्रवीण कुमारने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१२ मध्ये खेळला होता, जेव्हा ते केवळ २५ वर्षांचे होते. प्रवीणने शेवटचा खेळलेला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१२ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध टी-२० सामना होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…