क्रीडा

ब्रेकिंग : सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले, पुढील सामन्यात संघातून बाहेर?

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसनला संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमले आहे. या संघाचे नेतृत्व सध्या ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर करत आहे. मात्र, या मोसमातील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब आहे. हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या सर्वात खालच्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नर धावा करण्यासाठी संघर्ष करत असून तो सध्या फॉर्ममध्ये नाही. हैदराबादकडे इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयचा पर्याय आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या जागी जेसन रॉयला संघात स्थान मिळू शकते.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सनरायझर्स हैदराबाद उद्याच्या सामन्यासाठी आणि आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्याची घोषणा करत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध उद्या होणाऱ्या सामन्यासाठी संयोजन बदलण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे, त्यामुळे वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता असल्याचे संघाने म्हटले आहे.

आयपीएल मध्ये अर्ध्यातून कर्णधारपद काढून घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये कोलकाता संघानं कार्तिकला हटवून मॉर्गनकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. 2014 मध्ये हैदराबादनं शिखर धवनकडून कर्णधारपद काढून घेत डेरेन सॅमीकडे सोपवलं होतं. 2012 कुमार संगकारा, 2013 रिकी पॉटिंग, 2016 डेव्हिड मिलर आणि गौतम गंभीर यांनाही कर्णधारपदावरुन हाकलण्यात आलं होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago