क्रीडा

पंजाबला हरवत चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत मोठी भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले…

मुंबई : IPL २०२१, चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. चेन्नईचा हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले.

चेन्नईचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने त्याचा फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत मोठा धक्का दिला. तर पंजाबचा संघ आता सातव्या स्थानावर घसरला आहे.

दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला चेन्नईपुढे १०७ धावांचे आव्हान ठेवता आले होते आणि त्यांनी हे आव्हान सहा विकेट्स राखत पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईचा रनरेट चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago