क्रीडा

IPL 2021 : RCB आणि दिल्ली संघांना धक्का देत चेन्नईची मोठी झेप, पटकावले अव्वल स्थान

IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे.

या सामन्यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्यांचे सहा गुण झाले. गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचेही समान सहा गुण आहेत. पण चेन्नईचा नेट रनरेट जास्त असल्याने त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

IPL 2021 – Points Table

फॅफ ड्यु प्लेसिसच्या नाबाद ९५ धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २२० धावा केल्या होत्या. ऋतुराजने ४२ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६४ धावांची धडेकाबाज खेळी साकारली. ऋतुराज आणि फॅफ यांनी ११५ धावांची सलामी दिली. फॅफने अखेरपर्यंत दमदार फलंदाजी केली, पण त्याचे शतक फक्त पाच धावांनी हुकले.

चेन्नईने या सामन्यात केकेआरपुढे २२१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची पहिल्याच पॉवर प्लेमध्ये ५ बाद ३१ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रसेलने २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर सॅम करनचा एक चेंडू सोडण्याच्या नादात रसेल बाद झाला. रसेलने २२ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी साकारली. त्यानंतर पॅट कमिन्सने दमदार फटकेबाजी केली. कमिन्सने ३४ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची खेळी केली. पण अखेरच्या षटकात दुहेरी धाव घेताना प्रसिध कृष्णा धावचीत झाला आणि चेन्नईने १८ धावांनी सामना जिंकला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago