क्रीडा

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या संकटादरम्यान ही बातमी चिंताजनक आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. जानेवारी 2021 मध्ये सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर काही दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर सौरव गांगुलीला महिन्याभरात दोनदा अँजिओप्लास्टी करावी लागली. मात्र, त्यानंतर तो बरा झाला आणि सतत काम करत होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago