क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. यावेळी सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्याची कार रस्ता सोडून उलटली. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँण्ड्रयू सायमंड्स हा दोन वेळा विश्वकप जिंकलेल्या टीमचा भाग राहिलेला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया साठी २६ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्याची एक दिवसीय सामन्यांमधील कामगिरी चांगली राहिली. त्यानं १९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यानं सहा शतक आणि तीस अर्धशतक लगावली तर गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय सामन्यात १३३ विकेट घेतल्या.

२००३ च्या विश्व कप स्पर्धेत जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तान विरोधात केलेली १४३धावांची खेळी लक्षात राहिली. याशिवाय भारताविरुद्धच्या अंतिम फेरीतील सामने देखील त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली. २००७ च्या वेस्टइंडीज मधील वर्ल्डकप मध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली.

रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे’, असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटलंय. मैदानावर आणि त्यापलीकडेही आमचे सुंदर नाते होते, असं पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. सायमंड्स हा १९९९-२००७ च्या काळात क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago