राजकारण

राजकीय संबंधापोटी ठेकेदारांना रोहित पवार पाठीशी घालतात : भाजपचा आरोप

राजकीय संबंधापोटी ठेकेदारांना रोहित पवार पाठीशी घालतात असा घणाघाती आरोप भाजपणे केला आहे. सोलापूर महामार्गावरील कर्जत मिरजगाव येथील झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सुरत – विशाखापट्टणम महामार्गासाठी देशाचे पंतप्रधान तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखेपाटील यांच्या प्रयत्नातून १२००० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, या महामार्गातून अहमदनगर – सोलापूर महामार्गाचा समावेश आहे. परंतु कायदेशीर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे काम चालू होणार नाही, मात्र असे असले तरी सदर महामार्गावर दुरुस्ती खर्चाची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याने सरकारने यावर अद्याप पर्यंत फ़क्त ४५ लाख रुपयांचा निधी खर्च करून फ़क्त १२०० मीटर अंतराच काम केलं आहे, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून १५ दिवसांत केलेल्या रस्त्याचा कामावर खड्डे पडले आहे, दरम्यान या संदर्भात वेळोवेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना तक्रारी देवून सुद्धा ते संबधित अधिकारी आणी ठेकेदारांवर कोणतीही कारवाई न करता संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा घणाघात भाजपाने दिलेल्या निवेदनात केला आहे.

दरम्यान सोलापूर महामार्गावरील अहमदनगर ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे भरण्यासाठी जबाबदारी ही राज्य सरकारची असून सरकार मधले असलेले आमदार रोहित पवार यांनी देखील आपली जबाबदारी इतरांवर न ढकलता समर्थपणे सांभाळावी आणि जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्ती द्यावी अशी प्रतिक्रिया भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे. रस्त्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago