राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस: LGBT सेल सुरू करणारा पहिलाच पक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध समुदायासाठी अनेक सेल आहेत. आता राष्ट्रवादीनं परिवर्तनवादी व क्रांतिकारी निर्णय घेत एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा नवीन सेल सुरू करण्यात आला आहे. एलजीबीटी समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीनं हा सेल सुरू केला असून, आज (५ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सेलच्या माध्यमातून समस्या जाणून निराकरण करण्याचा प्रयत्नही केला जातो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago