राजकारण

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेचं स्मरण, एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 30 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपातील इतर नेते उपस्थित होते. तसेच, या शपथविधी समारंभाला एकनाथ शिंदेंच्या कुटुंबानेही हजेरी लावली.

विधानपरिषदेत्या तब्बल ११ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर आज अखेर या नाट्याच्या शेवट झाला. काल रात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. दुपारपर्यंत माध्यमांवर आणि सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हेच फिरत होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालाची भेट घेत त्यांना सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन, अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्यास इच्छूक नव्हते. पण भाजपच्या वरिष्ठांनी आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत घोषणा केली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतील, अशी माहिती नड्डा यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजभवनातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच आपण मंत्रिमंडळात राहणार नाही. आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारला पाठिंबा देवू, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजपचे आमदार असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आग्रह केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रती असणारी खरी निष्ठा आणि सेवेच्या समर्पणासाठी असणारी तयारी दर्शवते. त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन, असं अमित शाह ट्विटरवर म्हणाले.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago