राजकारण

लातूर महानगरपालिकेकडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्गाचे लोकार्पण

लातूर : लातूर महानगपालिकेने परमपूज्यनिय दादा बळीराम शिवराम गायकवाड यांच्या नावाने त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या सरस्वती विद्यालयाच्या समोरील रस्त्याचे आज त्यांच्या ९१ व्या जयंती च्या निमित्त “दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग” असे नामकरण करून त्यांचा गौरव केला आहे. नामकरण फलकाचे उद्घाटन लातूर महानरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

दादा बळीराम शिवराम गायकवाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या सोबत सामाजिक काम करण्याची संधी मिळाली. ते हैद्राबाद मुक्ती संग्राममध्ये स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले, परंतु स्वातंत्र्य सैनिक म्हणून कुठलाच मोबदला त्यांनी घेतला नाही. कासार सिर्सीचे पहिले दलीत विद्यार्थी, महाराष्ट्र शासनाने दोन वेळा त्यांचा “आदर्श शिक्षक”पुरस्कार देऊन गौरव केला. आज लातूर महानगरपालिकेकडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर महानरपालिकेचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टी चे शहर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड, प्रभाग ११ च्या नगर सेविका सौ रागिणीताई यादव, प्रभाग १२ चे नगर सेवक देवा भाऊ साळुंके, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, ॲड गणेश गोमसाळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, अमोल गित्ते, नगरसेवक पपुजी देशमुख, दत्ता सोमवंशी,विजयकुमार बळीराम गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत बानाटे, पतंजली योगचे युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे, सारंग वाघमारे, उद्योगपती सिध्देश्वर विसवेकर, संतोष कोचेटा, अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव चे अध्यक्ष राहुल क्षीरसागर, महार बटालियन चे माजी सुभेदार मुकुंद हलसे, माजी केंद्र प्रमुख पांडुरंग अंबुलगेकर, बिदर चे माजी शिक्षणाधिकारी जी. निवृतीराव, रेणापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago