इतर

एसटीचे विलनीकरण नाहीच?; राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीचा महत्त्वाचा अहवाल सादर..

मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अपूर्णच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले असून, हा अहवाल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काळात एसटीतील कर्मचारी भरतीही बंद करण्यात येणार असून, भविष्यात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. हा अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याचे समजते.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्यानंतरही एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणी कायम होती. या मुद्द्यावरच सध्या न्यायालयीन लढाईदेखील सुरू आहे. या सर्व प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारतर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल बुधवारी मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला.

अहवालात विलीनीकरणाबाबत नकार देण्यात आला असतानाच एसटी सेवा बंद होऊ नये, यासाठीच्या उपाययोजनांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर कर्मचारी संघटनेच्या इतर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, त्या पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याची सूचना मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. या अहवालानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago