Taj Mahal to be open to tourists
ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. पोलिसांनी संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. शोध मोहिमेनंतर संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्याचं सुरक्षा यंत्रणेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात फिरोजाबादच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यानेच याबद्दल फेक कॉल केला होता.
एका अज्ञात फोन कॉलवरून ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना आज सकाळी सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. फिरोजाबाद पोलिसांनी या कॉलचा शोध घेतला असता कॉल करणारा तरुण फिरोजाबादमध्ये असल्याचं कळलं. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत आपण खोटी धमकी देणारा फोन केल्याचं तरुणानं कबूल केलं.
ब्रेकिंग : ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची माहिती, पर्यटकांना बाहेर काढून शोध मोहीम सुरु
संपूर्ण परिसरात शोध घेतल्यानंतर सुरक्षिततेची खात्री करण्यात आली आहे. कंट्रोल रुमला मिळालेली सूचना खोटी असल्याचं समोर आलं आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. थोड्याच वेळात पर्यटकांसाठी ताजमहाल खुला केला जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…