सुशील कुमार मोदी यांच्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं जशास तसं उत्तर

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसशासित महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असून महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. तर दुसरीकडे मुंबई पावसाच्या पाण्याने डूबते आहे, अशा शब्दात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सुशील कुमार मोदी यांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. सुशील कुमार मोदीजी, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या बिहार राज्यापेक्षा देखील कमी असती, असा टोला लगावत खोटं बोलण्यात फडणवीस तुमच्या पेक्षाही अधिक पुढे आहेत, अशा शब्दात सचिन सावंत यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सुशील कुमार मोदी यांनी मुंबईच्या पावसावरून व तुंबलेल्या पाण्यावरून केलेल्या टीकेला देखील सावंतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सावंत म्हणाले, मुंबईच्या पावसाची आपण अजिबात चिंता करू नका. बिहारच्या पुराशिवाय आपण जे राज्याला डुबवलं आहे, येत्या निवडणुकीत जनता आपल्याला नक्कीच डुबवल्याशिवाय राहणार नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago