देश

दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 26 सप्टेंबर 2020

थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात…

  1. हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज! – इयन बिशपच्या या मताला सहमती दर्शवत गंभीर म्हणाला, “इयन बिशप यांचं राहुलबद्दलचं मत मलाही मान्य आहे. सध्याच्या घडीला मला असं वाटतं की राहुल हा IPLमधला सर्वोत्तम फलंदाज आहे!
  2. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.. जाणून घ्या प्रतिक्रिया – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी भेट घेऊन दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली..
  3. ड्रग्ज प्रकरणी दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल – अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे.
  4. उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर आली घरातील दागिने विकण्याची वेळ.. – अंबानी घराण्यातील लहान मुलगा, अनिल अंबानींची आर्थिक परिस्थिती खराब  झाली आहे. आता त्यांना त्यांच्या वकिलांची फी देखिल दागिने विकून द्यावी लागत आहे अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी कोर्टाला सांगितले की ते एक सामान्य आयुष्य जगत आहेत आणि फक्त एकच कार वापरत आहेत.
  5. गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण – विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे”  हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी चुकीच्या पद्धतीने घेतली गेली आहे

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात घडामोडीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर..

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago