देश

मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची केली तक्रार, पण मुलीवर पोलीस स्टेशनमध्येच झाला बलात्कार

राजस्थान : राजस्थानच्या सीकरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलीने हेड कॉन्स्टेबलवर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीचे म्हणणे आहे की हेड कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्याबाहेर पाठवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सीकर येथील एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी सीकरमधील सिंगरावट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. पोलिस तपासात समजले की प्रियकर आणि प्रेयसी श्रीगंगानगरमध्ये राहत आहेत. यानंतर, हेड कॉन्स्टेबल सुभाष कुमारला त्यांना आणण्यासाठी पाठवण्यात आले. सुभाष त्यांना आणायला गेला, त्याने प्रियकराला गाडीत पुढच्या सीटवर बसवले आणि तो स्वतः मुलीसोबत मागच्या सीटवर बसला. वाटेत त्याने मुलीचा विनयभंग केला. त्याने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली.

मुलीच्या म्हणण्यानुसार, ते सर्वजण रात्री पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, तेव्हा तिच्या प्रियकराला बाहेर पाठवण्यात आले. 29 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता सुभाषने मुलीला तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर सुभाषने प्रेमी युगुलाला कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. मुलगी घरी पोहचल्यानंतर तिने घडलेली संपूर्ण घटना तिच्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला.

पोलिसांनी पंचायत बोलावून प्रकरण मिटवून टाकले. परंतु, पीडित मुलीच्या प्रियकराने ते अमान्य केले. तो मुलीसोबत एसपी समोर हजर झाला आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यांनी त्वरित कारवाई करत हेड कॉन्स्टेबलला काढून टाकले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

7 दिवस ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

7 दिवस ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago